Advertisement

मोटारसायकल अपघातात १ ठार, तिघे गंभीर जखमी

प्रजापत्र | Saturday, 19/12/2020
बातमी शेअर करा

पाटोदा : मोटारसायकल आणि बुलेट गाडीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.  ही घटना मांजरसुंबा ते पाटोदा या राष्ट्रीय महमार्गावरील मोरेगाव फाटा येथे घडली.
  शाईन कंपणीची दुचाकी क्रमांक एम. एच 16- ए.च.4534 आणि बुलेट क्रमांक एम.एच 23 -बी. ए. 3668  या दोन गाड्यांचा समोरसमोर धडक झाली. या अपघातात सौंदना येथील राजेश मुरलीधर कदम यांचा जागीच मृत्यू झाला तर मोरगाव येथील शुभम भड व एक महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमींवर लिंबागणेश येथील रूग्णालयात उपचारार्थ पाठविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलीस पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यात नेकनूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक  विलास जाधव, लिंबागणेश पोलीस ठाण्याचे सुरेश पारधी, संतोष राऊत,गव्हाणे, ढाकणे महादेव  घटनास्थळी हजर होते. अपघातात ठार झालेल्या कदम यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे.

 

Advertisement

Advertisement