Advertisement

शिवकुमार स्वामी बीडचे नवे आरडीसी

प्रजापत्र | Monday, 19/06/2023
बातमी शेअर करा

बीड दि. १९ (प्रतिनिधी ) : राज्य शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून बीडचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून उस्मानाबाद येथील उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची नियुक्ती केली आहे. विद्यमान निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांना स्वतंत्रपणे नियुक्ती देण्यात येणार आहे. 
शासनाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यात बीडला शिवकुमार स्वामी यांची आरडीसी म्हणून नियुक्ती झाली आहे. बीडचे आरडीसी असलेले संतोष राऊत यांची बदली प्रस्तावित असून त्यांना अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. राऊत हे बीड जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांचा येथील कार्यकाळ देखील संपला आहे. त्यामुळे या ठिकाणी कोण येणार याची प्रतीक्षा होतीच. आता शिवकुमार स्वामी आरडीसी म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. शिवकुमार स्वामी यांना प्रशासनातील मोठा अनुभव असून त्यांनी उस्मानाबाद येथे चांगले काम केलेले आहे. 

Advertisement

Advertisement