Advertisement

रचला अपघाताचा बनाव,पोलीस तपासातून फुटले बिंग

प्रजापत्र | Sunday, 26/03/2023
बातमी शेअर करा

परळी- येथील शामाप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलावर मोटरसायकल व अॕटोच्या अपघातात एक ठार झाल्याचा बनाव रचून सदर तरुणाचा अपघाती मृत्यु दाखविण्यात आला होता.मात्र परळी पोलिसांनी घटनेचा तातडीने तपास करीत याप्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला काही तासात जेरबंद केले आहे.तो अपघात नसून खूनच असल्याचे समोर आले आहे.शनिवारी ही घटना घडली होती.भावकितील महिलेची छेड काढल्याच्या रागातून हा प्रकार घडला असल्याचे सांगितले जात आहे. 

 

      परळीच्या रेल्वे उड्डाण पुलावर शनिवारी दुपारी झालेल्या अपघाताच्या घटनेत एका तरुणाचा जागेवरच मृत्यू झाला होता. मात्र संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनेची परिस्थिती पाहून हा अपघात नव्हे तर खूनच असल्याचा संशय व्यक्त केला आणि तो संशय तंतोतंत खरा ठरला भावकितील छेडछाडीच्या वादातून तरुणाचा काढला काटा काढल्याचे निष्पन्न करीत केवळ एका तासातच आरोपीच्या मुसक्या आवळुन जेरबंद केले.शनिवारी दुपारी परळीच्या रेल्वे उडान पुलावर एक मोटरसायकल आणि पिकअपच्या ज्याचा क्रमांक एम एच २१ / ५७१३ अपघातात तालुक्यातील डाबी या ठिकाणच्या संपत्ती भारत पारवे वय २३ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तर निकम केरबा एंगडे हा तरुण गंभीरित्या जखमी झाला होता त्यास अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.सदर घटना घडताच संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्रसिंग ठाकूर पोलीस जमादार दादासाहेब बिक्कड, पोलीस नायक रुपेश शिंदे, अर्जुन मस्के, संजय कोकाटे, मोहन दुर्गे आदींनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनेचा आढावा घेतला असता हा अपघात नसून खूनच असल्याचा अंदाज व्यक्त करीत त्या दृष्टीने तपासाची वेगवान चक्र फिरवली असता सदरची परळी तालुक्यातील डाबी गावातील भावकितील एक तरुणाने काही दिवसांपूर्वी महिलेची छेड काढली असल्याची माहिती ह्या पोलिसांना मिळाली व संभाजीनगर पोलिसांचा तो अंदाज तंतोतंत खरा ठरलागावातील भावकितील मयत तरुणाने भावकितील भावजई होत असलेल्या महिलेचा हात धरून छेड काढल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी केल्याने त्या महिलेच्या दिराने मनात राग धरून घातपात परळीत घडवून आणल्याचे पोलीस तपासात उघड झाले.संभाजी नगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महेंद्रसिंग ठाकूर, पोह बिक्कड, पोना रुपेश शिंदे, अर्जुन मस्के, संजय कोकाटे, मोहण दुर्गे यांनी अवघ्या एका तासांतच आरोपी राम पारवे याच्या अंबाजोगाई शहरातून मुसक्या आवळीत जेरबंद केले.
 

Advertisement

Advertisement