Advertisement

झाडाला गळफास घेऊन शिक्षकाची आत्महत्या

प्रजापत्र | Tuesday, 14/02/2023
बातमी शेअर करा

किल्लेधारूर - धारुर तालुक्यातील कासारी बोडखा येथील जिल्हा परिषद शाळेवर सहशिक्षक असलेले नितीन लक्ष्मण पाटुळे रा. आसरडोह ( ता. धारुर ) यांनी आज मंगळवारी ( दि. १४ ) सकाळी ९ वाजता गळफास घेवून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. धारुर तालुक्यातील दहिफळ केंद्रांतर्गत असलेल्या कासारी बोडखा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक असलेले नितीन लक्ष्मण पाटुळे रा. आसरडोह ( ता. धारुर ) यांनी आज मंगळवारी ( दि. १४ ) सकाळी ९ वाजता घरातून बाहेर पडले व सरळ गावच्या पुर्वेस घरापासून काही अंतरावर लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. गावात घटना समजताच पुर्ण गावाने घटनास्थळी धाव घेतली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. घटनेची माहिती पोलीसांना देताच आडस चौकीचे पोलीस कॉ. सिध्देश्वर सचिन यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी धारुर येथील सरकारी दवाखान्यात पाठवून दिला. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयताच्या पश्चात आई -वडील, पत्नी, दोन मुली, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने आसरडोह येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement