मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची हत्या झाली नसल्याचा अहवाल एम्सने दिला आहे.सुशांतचा मृत्यू पंख्याला लटकून आत्महत्या केल्यामुळेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे असं एम्सच्या न्यायवैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
गळफासाशिवाय कोणत्याही खुणा त्याच्या अंगावर नव्हत्या तसेच विरोध केल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नसल्याचं गुप्ता यांनी एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाला रोज वेगळं वळण मिळत असताना एम्स रुग्णालयामधील टीमने सीबीआयकडे अंतिम रिपोर्ट सोपवला आहे. या रिपोर्टमध्ये हत्येचा दावा पूर्पणणे फेटाळण्यात आला असून सुशांतने आत्महत्या केल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे., एम्सचे डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून हत्येचा दावा फेटाळला असल्याचं सांगितलं आहे.