Advertisement

केतुरा आत्महत्या प्रकरणातील 'ती' चिठ्ठीच बनावट

प्रजापत्र | Saturday, 03/10/2020
बातमी शेअर करा

बीड: केतुरा येथील एका तरुणाने आत्महत्या केली नंतर सदर आत्महत्या मराठा आरक्षणासाठी असल्याचे भासवणारी एक चिठ्ठी व्हायरल झाली होती. सदर चिठ्ठी मयत तरुणाने लिहल्याचे सांगितले जात होते. मात्र सदर चिठ्ठी बनावट असुन मयत विद्यार्थ्याने लिहलेली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. हस्ताक्षर तज्ञांच्या अहवालानुसार आता पोलीसही या मतावर पोहचले आहेत.
बीड तालुक्यातील केतुरा येथील एका विद्यार्थ्याने चार  दिवसापूर्वी आत्महत्या केली होती. सदर आत्महत्या मराठा आरक्षणासाठी असल्याचे सांगणारी एक चिठ्ठी नंतर व्हायरल झाली. यामुळे राज्यात खळबळ माजली होती. अनेकांनी मयताच्या घरी भेटी दिल्या होत्या.
या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. कथीत चिठ्ठीतील हस्ताक्षर मयताचे नसुन कोणी तरी खोडसाळपणे चिठ्ठी लिहून ती मयताची असल्याचे भासवल्याचे समोर आले आहे. पोलीसांनी मयत विद्यार्थ्याच्या महाविद्यालयातून त्याच्या उत्तरपत्रिका हस्तगत केल्या. त्या आणि सदर चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञाकडे पाठविण्यात आली. यात चिठ्ठीतील हस्ताक्षर मयत विद्यार्थ्याचे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता पोलीसांचे लक्ष सदर चिठ्ठी लिहणारावर आहे. सरकारच्या विरोधात रोष निर्माण करण्यासाठी ही चिठ्ठी लिहली गेल्याचा पोलीसांचा अंदाज आहे.

 

Advertisement

Advertisement