Advertisement

पाण्याच्या टाकीखाली दारुड्या जुगाऱ्यांचा गराडा

प्रजापत्र | Saturday, 18/09/2021
बातमी शेअर करा

माजलगाव-शहरातील बीड रोडवरील पिण्याच्या पाणी टाकीखाली अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनासह दारुड्या,जुगाऱ्यांनी गराडा घातला आहे.यामुळे या ठिकाणी रहिवासी असलेल्या नागरिकांना त्रासाचा मोठा सामना करत प्रत्येक दिवस मेटाकुटीला येऊन सहन करावा लागत आहे.दरम्यान पाणी टाकीची सुरक्षाही धोक्यात आली आहे.
         माजलगाव नगरपरिषदेने शहरातील बीड रोड वरील स्वामी विवेकानंद नगर येथे सुजल योजनेतून साडेनऊ लाख लिटरची पाणी टाकी बांधली आहे.साडे नऊ लाख लिटरची क्षमता असणाऱ्या या पाणी टाकीतून शहराला पाणीपुरवठा केला जातो. सदरील पाणी टाकी मुख्य रस्त्यालगत असून या पाणी टाकी खाली मोठी मोकळी जागा आहे.तर आजूबाजूला प्रतिष्ठित कॉलीनी आहे. परंतु नगर परिषदेने पाणी टाकी खालच्या भागा कंपाउंड न केल्यामुळे याठिकाणी दारुड्या जुगाऱ्यासह अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी वाहनांनी गराडा घातला आहे.दिवसभर या ठिकाणी जुगार खेळला जातो.बसून दारू पिल्या जाते.त्यामुळे या ठिकाणी भांडने हानामारी चे प्रमाण वाढले प्रमाण  आहे.दारुबाज नागरी वस्तीचा विचार न करता उघड्यावर लघुशंका करतात.त्यामुळे या ठिकाणी असणाऱ्या रहिवासी नागरिकांना मोठ्या मुश्किलीने चा सामना करत राहावे लागत आहे.तर दारूच्या नशेत अनेक वेळेस दारूबाज पाण्याच्या टाकी वरही चढून जातात.त्यामुळे या ठिकाणी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारुड्यांचा गोंधळामुळे पाण्याच्या टाकीचि सुरक्षाही धोक्यात आली आहे.त्यामुळे मुख्याधिकारी पोलीस प्रशासनाने सदरील भरतीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी येथील रहिवासी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

 

कंपाउंड वॉल बांधणार
सदरील पाणी टाकीखालील मोकळ्या जागेतील अवैध प्रवासी वाहन तळामुळे शेजारी असणाऱ्या रहिवासी नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.येथे जमा होणाऱ्या दारूड्यांमुळे पाणी टाकीची सुरक्षाही धोक्यात आली आहे. त्यामुळे सभागृहात हा विषय मांडून कंपाउंड वॉल बांधण्यात येणार असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.

Advertisement

Advertisement