Advertisement

आधार-पॅनकार्ड लिंक करण्यास पुन्हा मुदतवाढ!

प्रजापत्र | Saturday, 18/09/2021
बातमी शेअर करा

पॅन कार्ड’ आणि ‘आधार कार्ड’ लिंक करण्यासाठी मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोण्याची मुदत होती.  केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोण्याची मुदत सहा महिन्याने वाढवली आहे. आता ३१ मार्च २०२२ पर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करु शकता.
आयकर विभागाने आधारला पॅन कार्ड लिंक करण्यासाठी वारंवार सूचना केली होती. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात बातम्याही दिल्या जात होत्या. मात्र तरीदेखील अनेकांनी लिंक केले नाही. वारंवार सूचना करुनही आधार-पॅन लिंक केलं जात नाही. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत १२-अंकी बायोमेट्रिक आधार क्रमांक पॅन कार्डशी जोडणे बंधनकारक केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१७-१८ च्या वित्त विधेयाकामध्ये कर प्रस्तावात दुरुस्त्याद्वारे सुधारणा करून आधार अनिवार्य केले आणि यामुळे एका पेक्षा अधिक पॅन कार्डचा वापर करून कर चुकवणाऱ्यांवर चाप बसणार आहे.

 या मुळे किती होऊ शकतो दंड?

बँक खाते उघडण्यासाठी, म्युचअल फंड ट्रन्जेक्शन,स्टॉक मार्केट गुंतवणूक, बँक व्यवहारासाठी पॅन कार्ड सक्तीचं करण्यात आलं आहे. ३१ मार्च २०२२ पर्यंत आधार-पॅन लिंक न केल्यास ५० हजारांपेक्षा जास्तच्या व्यवहारांवर १० हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो. दर आधार-पॅन लिंक नसेल तर बँकमार्फत टीडीएस कट होत शकतो. आयकर विभाग कलम १३९ एए नुसार, आधारशी पॅन न लिंक केल्यास पॅन कार्ड बंद होऊ शकते. तसेच आयटीआरही फाइल होणार नाही.

कसं कराल लिंक -
 या संकेतस्थळावर आधार-पॅन लिंक असा पर्यंय मिळेल. त्यानंतर आपला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आधार कार्डाची माहिती द्यावी लागेल. यानंतर युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात युआयडीएआयकडून या माहितीची पडताळणी केली जाईल. आधार कार्डावरील नाव आणि नागरिकाने वेबसाईटवर दिलेले नाव यात मोठी तफावत आढळल्यास वन टाईम पासवर्डची(ओटीपी) गरज भासेल. मोबाईल क्रमांक आणि ई-मेलद्वारे हा क्रमांक कळविला जाईल.