Advertisement

चुंबळीत सशस्त्र दरोडा

प्रजापत्र | Wednesday, 09/06/2021
बातमी शेअर करा

बीड - पाटोदा तालुक्यातील चुंबळी येथील शेतात राहणाऱ्या एका शेतकरी कुटुंबावर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला करत ५० हजार  नगदी व साडेसहा डोळे तोळे सोने लंपास केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. रवींद्र शहादेव सिरसाट रा.चुंबळी येथील  शेतातील घरात राहतात. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंब देखील राहते रात्री साडेबाराच्या दरम्यान त्यांच्या घरी अज्ञात चोरत्यांनी हल्ला करत  शहादेव सिरसाट यांना दगडाने जखमी केले. यानंतर आरडाओरडा होत असल्याने शेजारील पत्र्याच्या शेडमध्ये असणारा त्यांचा मुलगा रवींद्र सिरसाट बाहेर निघाला असता त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याला जखमी करण्यात आले.

यावेळी चाकूचा धाक दाखवत घरातील ५० हजार नगदी व रवींद्र सिरसाट यांच्या पत्नीच्या अंगावरील व सखुबाई सिरसाट यांच्या अंगावरील एकूण साडे सहा तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले. या हल्ल्यात रवींद्र शहादेव  सिरसाट हे जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थागुशाचे पो. नि. भारत राऊत,पोलीस ठाण्याचे पी.आय. महेश आंधळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला पुढील तपास पाटोदा पोलीस करत आहे.

Advertisement

Advertisement