Advertisement

वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

प्रजापत्र | Tuesday, 23/03/2021
बातमी शेअर करा

पाटोदा- तालुक्यातील पारगाव (घुमरा) येथे एकाचा वीज पडून मृत्यु झाल्याची घटना आज (दि.२३) सकाळी घडली. आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाटोदा तालुक्यातील पारगाव (घुमरा) येथील शहाजी भुजंगराव भोसले (वय६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. हे रात्री शेतातील पिकाची पाहणी करण्यासाठी शेतात गेले होते.

 

सकाळी दुध घेऊन आले नाहीत खुप वेळ झाला, अजून घरी कसे आले नाहीत, म्हणून त्यांना पाहण्यासाठी शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात आला. मृत शेतकऱ्यांना दोन मुले आहेत ,सध्या यांचे घराचे बांधकाम चालु आहे . पारगाव घुमरा येथे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .ग्रामीण रुग्णालयात प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी आणले होते .

 

पाटोदा पोलिस जमादार डोके अधिक तपास करत आहेत . गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाका सुरू असून यात अनेकांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यात आज सकाळी शेतकऱ्याचा बळी गेला आहे.

Advertisement

Advertisement