Advertisement

राज्यात कोसळणार पावसाच्या धारा

प्रजापत्र | Friday, 08/05/2026
बातमी शेअर करा

मुंबई : ठाणे जिल्ह्यात गुरुवार (ता. ७) रोजी अनेक भागात तुफान वारा सुटला असून सर्वत्र धुळीचे लोट पसरले होते. यामुळे काही भागात झाडांची पडझड झाली असून जनजीवन विस्कळीत झाले होते. त्याचबरोबर मुरबाड तालुक्यासह रायगड जिख्यातील खालापूर, महाड, पोलादपूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. अशातच आता हवामान विभागाने जोरदार पावसाचा अलर्ट जारी केला आहे.

     हवामान विभागाने राज्यात १४ ते २० मे दरम्यान मुसळधार पावसासह गारपिटीचा इशारा दिला आहे. यावेळी कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.त्याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीची शक्यता आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

महाराष्ट्रासह देशभरात हवामान विभागाने पावसाचा इशारा जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अलर्टनुसार पुढील तीन दुःस्वास म्हणजेच ८, ९ आणि १० मे रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि गोवा राज्यात मुसळधार पाऊस पडेल. या दरम्यान सोसाट्याचा वारा आणि वीज पडण्याची शक्यता आहे.यासह दक्षिण आणि मध्य भारतातही पावसाच्या सरी कोसळू शकतात. मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, पश्चिम बंगालसह विदर्भ पट्ट्यात ताशी 30-50 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. तसेच तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, पुद्दुचेरी, रायलसीमेपर्यंत सर्वदूर पावसाचा धुमाकूळ दिसेल.

Advertisement

Advertisement