Advertisement

अडीच वर्षांच्या चिमुरडीवर १३ वर्षीय मुलाचा अत्याचार

प्रजापत्र | Thursday, 02/04/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.२(प्रतिनिधी): तालुक्यातील एका अडीच वर्षांच्या चिमुरडीवर गावातीलच १३ वर्षीय शाळकरी मुलाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना ३१ मार्च रोजी घडली. याप्रकरणी बर्दापूर पोलिसांनी संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

    अधिक माहितीनुसार, ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पीडित चिमुरडी तिच्या घरामागील मोकळ्या मैदानात खेळत होती. यावेळी गावातीलच १३ वर्षीय मुलाने तिला गाठून तिच्यावर अत्याचार केला. या कृत्यामुळे चिमुरडीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. पीडितेच्या आईने १ एप्रिल रोजी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली.अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या पाच दिवसांपूर्वी दोन वर्ष पाच महिने वय असलेल्या चिमुरडीवर १५ वर्षांच्या मुलाने अश्लील व्हिडीओ पाहून अत्याचार केला होता, ज्यात पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. ती घटना ताजी असतानाच आता बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा दुसरा प्रकार उघडकीस आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एस. कांबळे या प्रकरणाचा वेगाने तपास करत असून कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.

 

Advertisement

Advertisement