Advertisement

डोळ्यात मिरची टाकून रोडरॉबरी करणारी टोळी जेरबंद       

प्रजापत्र | Monday, 08/12/2025
बातमी शेअर करा

बीड दि.८ (प्रतिनिधी)-परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला सायंकाळी ७ च्या सुमारास डोळ्यात मिरची टाकून त्याच्या हातातील अंगठी आणि सोन्याची चैन लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.५) घडला होता.याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास करीत अवघ्या तीन दिवसांत या टोळीला गजाआड केले आहे.यावेळी चोरीला गेलेला मुद्देमाल ही पोलिसांनी हस्तगत केला. 
           परळीच्या ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या धारावती तांडाकडे निघणाऱ्या कालरात्री मंदिराजवळ एका तरुणाला चार जणांनी पाठलाग करून अडविले.यावेळी त्याच्या डोळ्यात चटणी टाकून त्याच्याकडे सोन्याची अंगठी आणि लॉकेट लंपास केले.यात परळीच्या ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने सुरु केला.पोलीस उपनिरीक्षक सुशांत सूतळे व त्यांच्या टीमला या गुन्हयाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पंकज तुकाराम उगलमुगले (वय-२५,रा.पांगरी,ता.परळी),वैभव राम बिडगर (वय-२०,रा.दाऊतपूर,ता.परळी),शामसुंदर बाळासाहेब फड (रा.मरळवाडी,ता.परळी),आदित्य सुरेश उपाडे (वय-२०,रा.सिद्धार्थ नगर,परळी) याना ताब्यात घेऊन चौकशी केली असता या चौघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांच्या या कारवाईत चैन,अंगठी,मोटारसायकल,स्कुटी व कोयता असा एकूण १ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.ही कारवाई पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत,अप्पर पोलीस अधिक्षक चेतना तिडके,पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे,पोलीस हवालदार मारुती कांबळे,रामचंद्र केकाण,विष्णू सानप,गोविंद भताने,सचिन आंधळे,अतुल हराळे यांच्या वतीने करण्यात आली.

Advertisement

Advertisement