Advertisement

ट्रॅक्टर-मोटारसायकल अपघातात दोघे गंभीर

प्रजापत्र | Monday, 01/02/2021
बातमी शेअर करा

केज दि.१ - केज पासून अवघ्या दोन किमी अंतरावर केज कळंब रोडवर ट्रॅक्टर आणि दोन मोटारसायकल तिहेरी अपघातात दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
         सोमवारी दि.१ रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास केज कळंब रोडवर डिस्कव्हर आणि होंडा शाईन गााडी क्रमांक म. हा.२३.एच.के.७८८९ या क्रमांकाची मोटारसायकल आणि आणि ट्रॅक्टर क्रमांक म. हा.२३.क्यू.४८६३.  त्यात मोटारसायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींपैकी विजय चंद्रसेन जाध
व वय ५०.रा. गांजी. ता. केज यांच्या डोक्याला गंभीर मार लागलेला असून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई ला नेण्यात आले आहे. तर अन्य जखमी कळंब येथील गणेश बंडू खैैरमोडे, (वय २८) असल्याचे समजते.
 

Advertisement

Advertisement