Advertisement

राजकीय कार्यक्रमाला ग्रामसेवकाने लावली हजेरी

प्रजापत्र | Sunday, 14/04/2024
बातमी शेअर करा

बीड-लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशभरात आदर्श आचारसहिंता लागू असताना नेकनूरमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागताच्या कार्यक्रमाला ग्रामसेवक दत्ता नागरे यांनी उपस्थिती लावली असल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.त्यामुळे नागरे यांच्यावर आचारसहिंतेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाईची मागणी नेकनूरमधून जोर धरत आहे. 
        लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्याने देशभरात आदर्श आचारसंहितेचे पालन करणे शासकीय कर्मचाऱ्यांना बंधनकारक आहे.मात्र बीड जिल्ह्यात राजकीय पुढाऱ्यांसोबत लागेबंध असलेले कर्मचारी आचारसहिंतेचे ही भान न राखत सर्रासपणे राजकीय कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसून येतात.दोन-ते तीन दिवसापूर्वी नेकनूरमध्ये कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या जंगी स्वागताचा कार्यक्रम पार पडला.यावेळी नेकनूरचे ग्रामसेवक दत्ता नागरे यांची यावेळी उपस्थिती होती.सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत असून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. 

 

Advertisement

Advertisement