Advertisement

खंडेश्वरी परिसरात दोन गट भिडले 

प्रजापत्र | Friday, 12/04/2024
बातमी शेअर करा

 बीड - एकमेकांच्या शेजारी राहत असणाऱ्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटातील जवळपास पंधरा जण जखमी असून ९ जण गंभीर जखमी आहेत तर इतर किरकोळ जखमी आहेत. सदरील घटना आज शुक्रवारी (दि.१२) दुपारी १२ बाजण्याच्या सुमारास घडली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . 

 

 

सविस्तर माहिती अशी कि,शहरातील खंडेश्वरी देवी मंदिर परिसरातील रहिवासी शिंदे आणि कांबळे हे दोन कुटुंब शेजारी राहतात, हे दोन्ही गट आमने-सामने आले त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यात लाठ्याकाठ्या, दगडाने मारहाण झाल्याने नऊजण गंभीर जखमी झाले. सहा ते सात जण किरकोळ जखमी आहेत.स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवल्याने मोठा अनर्थ टळला. तातडीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरु करण्यात आले. सर्व रक्ताने माखलेल्या अवस्थतेत आल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पेठ बीड पोलीसांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली असून जखमींचे जबाव नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सदरील घटना
जागेच्या वादातून घडल्याची चर्चा आहे.

Advertisement

Advertisement