Advertisement

विहरीत आढळला मृतदेह !

प्रजापत्र | Monday, 08/04/2024
बातमी शेअर करा

अंबाजोगाई- तालुक्यातील कोळकानडी येथे विहीरीत ३५ ते ४० वयाच्या अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे.

 

 

अधिक माहिती अशी की, अंबाजोगाई तालुक्यातील कोळकानडी येथील शेतकरी केरबा शंकर कदम यांच्या शेतात गट क्र. १८९ मधील विहिरीत (दि.४) सकाळी पावणे अकराच्या सुमारास पुरुषाचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

 

घटनेची माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलीसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सदरील इसम अनोळखी असून, ओळख पटावी असे त्याकडे काही सापडले नाही. यामुळे पोलीसांनी ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ओळख पटल्यानंतर हा प्रकार नेमका घातपाताचा आहे की, आत्महत्या हे उघड होईल.

Advertisement

Advertisement