बीड- एकनाथ शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर अज्ञात लोकांनी खंडेश्वरी बायपासच्या पुलाजवळ गाडी आडवून हल्ला केल्याची घटना सायंकाळी ६.३० च्या सुमारास घडली असून ज्ञानेश्वर खांडे यामध्ये जखमी झाले असून त्यांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते.
उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे हे गावाकडे जात असताना सायंकाळी ६.३० च्या सुमारास अज्ञात लोकांनी खंडेश्वरी नजीकच्या बायपास जवळ त्यांच्या गाडीला गाडी आडवी लावून त्यांना गाडीतून उतरून मारहाण केली असून त्यांना जबर मार लागल्यामुळे त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. दरम्यान हा हल्ला कशामुळे केला याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
बातमी शेअर करा