अंबाजोगाई- अंबा साखर कारखाना रोडवरील सातफळे फाट्यानजीच मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याची घटना २७ मार्च रोजी संध्याकाळी घडली. या अपघातात दोनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सुशांत सुनील ठाकूर (वय २३ रा.पाटोदा म.)व बालाजी भुजबळ (वय ३० रा.जोड जवळा जि.लातूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. शिवहर भुजबळ हे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंबा साखर कारखाना ते देवळा नजीक असलेल्या सातफळे फाट्यानजीक मोटारसायकल (क्र.एम.एच.११-सी.यु.२७५८) आणि (एम.एच.२४.डी.एस.९१८३) समोरासमोर अपघात झाला. अपघात इतका भयानक होता की दोन्ही मोटारसायकलच्या हेडलाईटच्या भागाचे अक्षरश: तुकडे झाले होते. कुंभेबळ,सातफळ,ममदापुर पाटोदा येथील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना अंबाजोगाई येथे स्वारातीमध्ये दाखल केेले. दरम्यान, अपघातातील दोघांचा मृत्यू झाल्याचे घोषीत करण्यात आले. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पो.नि.यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. सुशांत याचे दहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते. ममदापूर येथील मुलीसोबत लग्न झाले होते. दहा महिन्यापूर्वीच लग्न झाले आणि अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.