आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आज आज रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद दौरा होत आहे. शिवसेना नेते भास्करराव जाधव, आनंद गीते यांच्यासह कोकणातले अन्य शिवसेनेचे नेते याकार्यक्रमास उपस्थित आहेत. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
"कोकण माझ्या हक्काचा आहे कोकण हा आपलाच आहे. कोकणाला विसरणारा मी नाही कोकणाचा आशीर्वाद घेऊनच मी महाराष्ट्रात फिरत आहे. शिवसेनाप्रमुख सुद्धा कोकण वासियांसमोर नतमस्तक झाले होते. त्यामुळे आपलं घट्ट नातं आहे. सध्या भाजपचे शीर्षासन सुरू आहे. या असभ्य आणि अस संस्कृत भाषेला भास्कर राव तुम्ही उत्तर द्यायला जाऊ नका," असे उद्धव ठाकरे म्हणाले."मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. "बाकीच्या देशात पाहिलं तर त्या पक्षातील नेता पहिला मुख्यमंत्री होता. त्या परिस्थितीत मला मुख्यमंत्री पद स्वीकाराव लागलं होतं. म्हणून तुम्ही गद्दारी करून मला खाली खेचलं. मोदीजींची तीनपटं आहेत ते आम्हाला बेलगाम काहीही बोलत आहेत, असे म्हणत ठाकरेंनी राणे पिता पुत्रांवर जोरदार हल्लाबोल केला.
"अनेक नेते, कार्यकर्ते म्हणत आहेत उद्धवजी आपली लाट आहे आणि मोदी सरकारची वाट आहे असं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सध्या भाडोत्री जनता पार्टीने भ्रष्टाचारी अभय योजना सुरू केलेली आहे मोदींनी यांची गॅरंटी दिलेली आहे. चारसो पारनंतर देशाची घटना बदलतील, देशाची घटना बदलून हुकूमशाही आणण्याचा त्यांचा डाव आहे," असे आरोपही उद्धव ठाकरे यांनी केले.