Advertisement

वाळूने भरलेले दोन हायवा पकडले

प्रजापत्र | Wednesday, 06/03/2024
बातमी शेअर करा

चकलांबा - चकलांबा पोलीस रात्री पेट्रोलिंग करत असताना वाळूची विनापरवाना बेकायदेशीर चोरटी वाहतूक करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या असून या कारवाईत तब्बल साठ लाख रुपयांचा मुद्द्यामाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी कि, चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे व पथक पेट्रोलिंग करत असताना त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, राक्षस भवन भागातून वाळूची विनापरवाना बेकायदेशीर चोरटी वाहतूक होत आहे. त्यानुसार त्यांनी सापळा रचला असता रात्री 21.30 वाजता ड्रायव्हरसह वाळूने भरलेला एक हायवा व सकाळी 7.00 वाजता ड्रायव्हरसह वाळूने भरलेला एक हायवा असे एकूण दोन हायवा (किंमत अंदाजे 60 लाख रुपये) सापळा रचून पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपी नामे शेख नबी शेख अब्बास, वय 40  राहणार चकलांबा, अहमद शेख राणा उमापूर, नफिर वजीर पठाण वय 28 महार टाकळी, संतोष नाटकर राहणार राक्षसभुवन तालुका गेवराई यांच्यावर गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुमावत करत आहेत.
   सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपवगीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एक शिंगे, प्र पोलीस उपनिरीक्षक कुमावत, श्री.गुजर, श्री.घोंगडे, पवळ,रुईकर, सुरवसे यांनी केली.

Advertisement

Advertisement