Advertisement

मनमाडमध्ये अडविली संभाजी भिडेंची गाडी

प्रजापत्र | Friday, 01/03/2024
बातमी शेअर करा

मनमाड - शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची मनमाडमध्ये गुरुवारी रात्री उशिरा गाडी अडवली. यावेळी भीमसैनिकांनी भिडे यांना काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भीम सैनिकांना ताब्यात घेतलं. यावेळी काहींनी संभाजी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

या संपुर्ण प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मनमाड पोलीस ठाण्यात भीमसैनिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.. मिळालेल्या माहितीनुसार, संभाजी भिडे हे गुरुवारी नाशिकच्या येवला येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर रात्री उशिरा ते कारने मनमाड मार्गे धुळ्याकडे निघाले असताना मालेगाव चौफुलीवर भीम सैनिकांनी त्यांची गाडी अडवून जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी,तर काहींनी भिडे यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. संबधित घटनेची माहिती मिळताच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक तातडीने मनमाडमध्ये दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून गोंधळ घालणाऱ्या भीमसैनिकांना ताब्यात घेतलं.

परिस्थिती नियंत्रणात आल्यावर संभाजी भिडे धुळ्याच्या दिशेने रवाना झाले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत भीमसैनिकांवर गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. यावेळी भीमसैनिकांनी मनमाड पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केली.

Advertisement

Advertisement