बीड - युपीमधील मुजफ्फरनगर येथून कर्नाटकाकडे रिकामे कॅरेट घेऊन जाणारा आईसर टेम्पो आज पहाटे ६:३० वाजता छत्रपती संभाजी महाराज चौकातील बायपास येथून जात असतांना टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो पलटी झाला.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच महामार्ग मित्र पथकाचे राधाकिसन आरसुळ, प्रतीक कदम, राम गायकवाड, महादेव पवार आदींनी घटनास्थळी धाव घेत अपघात ग्रस्त टेम्पो क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या बाजूला सारुन वाहतूक सुरळीत केली.
बातमी शेअर करा