Advertisement

अंतरवाली सराटीत मराठा बांधवांची बैठक

प्रजापत्र | Sunday, 25/02/2024
बातमी शेअर करा

जालना - आज (२५, फेब्रुवारी) जरांगे यांनी मराठा बांधवांची बैठकही बोलावली आहे. या बैठकीसाठी शेकडो मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आहेत. जरांगे पाटील यांनी ही निर्णायक आणि शेवटची बैठक असल्याचे जाहीर केल्याने ते आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तत्पुर्वी या बैठकी आधी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा आंदोलनावरुन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

 

 

काय म्हणाले जरांगे पाटील?

 

"मी एका सामान्य घरातून आलो समाजावर प्रेम करतो म्हणून हे घडलं. मी जर लबाड असतो तर इथं पर्यंत पोचलो नसतो समजावर माझी निष्ठा आहे. त्यामुळे समाज माझ्यावर प्रेम करतो. कुणी तरी स्वप्न बघत आहे मराठ्यांना हरवायचं. त्यामुळे ही बैठक ३ नंतर घ्यायची होती मात्र आत्ता घ्यावी लगत आहे. मी कुठल्याच पक्षाचा नाही.." असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

हे सगळ फडणवीसांमुळे घडत आहे त्यामुळे आत्ता निर्णायक निर्णय घ्यायचा आहे. महाराष्ट्रात दरारा निर्माण झाला आहे म्हणून त्याला हे संपवायचे आहे. बैठक झाल्यानंतर सागर बंगल्यावर येतो, मला मारुन दाखवा. नारायण राणे यांनी अंबड तालुक्यातील दोन ते चार जण उचलून नेले ते आत्ताही माझ्या विरुद्ध प्रेस घेतील, माध्यमांवर ही दबाव टाकला जात आहे, त्यात काही समन्व्यक पण आहेत, असे खळबळजनक आरोप जरांगेंनी केले.

Advertisement

Advertisement