जालना दि. २४ (प्रतिनिधी ) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आजपासून गावागावात रास्ता रोकोचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यात बदल करून सध्या केवळ एक दिवसाचा रास्ता रोको जाहीर करून आज दुपारी आंदोलनाची दिशा ठरणार होती. त्यानुसार आता जरांगे यांचे धोरण ठरले आहे. आज संध्याकाळी रास्ता रोको चे रूपांतर धरणे आंदोलनात करा असे जरांगे यांनी स्पष्ट केले असून उद्या 25 ला पुन्हा बैठक, होईल समाज बांधवांनी महत्वाचे उद्या बोलायचे आहे असे जरांगे म्हणाले आहेत.
मला काही उद्या महत्वाचे बोलायचे आहे,नाशिक ला बंजारा समाजाचा मोठा कार्यक्रम आहे, आम्ही सर्व समाजाला मानणारे,पाठीमागच्या सारख कोणी जाळपोळ करून काही मध्ये भीतीचे वातावरण म्हणून मुलांना अडचण नको, म्हणून आंदोलनात बदल करत आहोत. 3 मार्च ला फायनल रास्ता रोको होणार असल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे.
जरांगे यांनी आंदोलनाची दिशा स्पष्ट करताना आज दुपार नंतरच रास्ता रोकोला धरणे आंदोलनात रूपांतर करण्याचे सांगितले आहे. त्यासोबतच रास्ता रोको चा जो पॉईंट असेल त्याच ठिकाणची आमची जबाबदारी, इतर ठिकाणी आमची जबाबदारी नाही असे सांगून सरकार रडीचा डाव खेळत आहे, तीन तीन राजे असल्याने कोणालाच निर्णय घ्यायचे कळेना, पहिल्या राजाला दया होती, तीन राजे आहेत, दोन इतर राजानी एका राजाला साथ द्यावी , याला सरकार चालवणे म्हणतात का? मला हे हरवायला बघत आहेत, तुमचे लोक डाव टाकत आहेत असेही मनोज जरांगे म्हणाले
बातमी शेअर करा