भारतात कोट्यवधी लोक दररोज सार्वजनिक वाहतूक वापरतात. तुम्हीही सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना PPI म्हणजेच प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट जारी करण्याची बँकांना परवानगी दिली आहे आणि PPI च्या वापरामुळे, लोक सार्वजनिक वाहतुकीने अधिक सहज प्रवास करू शकतील.
तुम्हाला कसा फायदा होईल?
सोप्या शब्दात सांगायचे तर, सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बँका असे कार्ड किंवा वॉलेट देऊ शकतात, ज्याचा वापर करून तुम्ही डिजिटल पेमेंट करून कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीची तिकिटे सहज खरेदी करू शकता. याच्या मदतीने तुम्ही खूप सहज लवकर पेमेंट करू शकाल आणि तुमचा प्रवास अधिक सोयीस्कर होईल.
PPI म्हणजे काय?
PPI म्हणजे प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स हे असे साधन आहे ज्यात तुम्ही पैसे टाकू शकता आणि त्याच्याद्वारे कोणत्याही वस्तू किंवा सेवेसाठी पैसे देऊ शकता. मेट्रो कार्ड हे PPI चे उदाहरण आहे.
RBI नियम बदलणार
आरबीआयने पीपीआयच्या मास्टर डायरेक्शनमधील बदलास मान्यता दिली आहे आणि बदलानंतर, पीपीआय जारी करणाऱ्या बँकांसह बिगर बँकिंग संस्था सार्वजनिक वाहतूक वापरणाऱ्या प्रवाशांना पीपीआय जारी करू शकतात. यामुळे सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्याची सुविधा बऱ्याच अंशी डिजिटल होईल आणि प्रवासही अधिक सोपा होईल.