Advertisement

पतसंस्थेच्या कॅशीयरला ३९ लाखाला लुटले 

प्रजापत्र | Saturday, 17/02/2024
बातमी शेअर करा

अंबाजोगाई-  दिवसभराचे कामकाज आटोपून पतसंस्थेत जमा झालेली रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी निघालेल्या कॅशियरला तीन चोरट्यांनी रस्त्यात अडवून पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून त्याच्या जवळील जवळपास ३९ लाख रुपयांची रक्कम लुटल्याची घटना अंबाजोगाईत शुक्रवारी (दि.१६) रात्री घडली.

 

  अधिक माहितीनुसार, अंबाजोगाई शहरातील राजर्षी शाहू पतसंस्थेचे कॅशियर गणेश देशमुख हे शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास दैनंदिन कामकाज आटोपून दिवसभरात जमा झालेली जवळपास ३९ लाख रुपयांची रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी सेवकासोबत दुचाकीवरून निघाले होते. ते मुकुंदराज कॉलनीत आले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या तिघा चोरटयांनी त्यांना अडविले. स्वतः जवळील पिस्तूल काढून त्यांनी ती देशमुख यांच्या डोक्याला लावली. पिस्तूल आणि त्यासोबत चाकूचा धाक दाखवून त्यांनी देशमुख यांच्याकडील ३९ लाख रुपये रक्कम ठेवलेली बॅग घेतली आणि पसार झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, भर वस्तीत घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Advertisement

Advertisement