घाटनांदुर दि.१६ (वार्ताहर)- धनगर समाजासाठी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाची शासनाने अंमलबजावणी करावी यासाठी शुक्रवारी (दि.१६) सकाळी अंबाजोगाई तालुक्यातील घटनांदूर येथे रास्ता रोको करण्यात आला.
धनगर समाजासाठी अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाची शासनाने अंमलबजावणी करावी व राज्यघटनेमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण असून गेली 75 वर्षे राज्य सरकार फसवणूक करत असल्यामुळे घाटनांदुर येथील सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने शुक्रवारी (दि.१६) सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी रस्ता रोको करून राज्य सरकारने 20 फेब्रुवारीला अधिवेशनात धनगर आरक्षणाचा अनुसूचित जमाती आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी घाटनांदुरचे मंडळ अधिकारी श्री.घुगे, तलाठी कराड, पोलीस निरीक्षक पडवळ यांना निवदेन देण्यात आले. यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.