Advertisement

डॉ.वाल्मिक मुंडे यांचा अपघातात मृत्यु 

प्रजापत्र | Monday, 12/02/2024
बातमी शेअर करा

परळी- तालुक्यात सध्या रस्त्याचे काम चालू असून या अर्धवट कामाच्या कारणामुळे आज  डॉ.वाल्मिक मुंडे यांचा कार नालीच्या पाईपला धडकून अपघात झाला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य एक डॉ.जखमी झाले असून त्यांना स्वारातीमध्ये दाखल करण्यात आले असून हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास घडला आहे .

 

 

जिरेवाडी बायपास रोडवर गावा लगत एका ठिकाणी नाला पुलाचे काम चालू असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दिशादर्शक बोर्ड लावलेला नाही. नाला काम अर्धवट असल्याने रस्त्यात पाईप पडलेले आहेत. यामुळे वाहन चालविताना अनेक अडचणी येत आहेत. या रस्त्यावरून डॉ प्रवीण खाडे व डॉ.वाल्मीक मुंडे हे दोघेजण कारने जिरेवाडी रविवारी रात्री अकराच्या सुमारास येत होते. नादुरुस्त रस्त्याच्या अंदाज न आल्याने कार रस्त्यावरील पाईपला धडकुन खाली खड्ड्यात कोसळली. त्यात डॉ. वाल्मीक मुंडे यांचा मृत्यू झाला. तर डॉ खाडे हे जखमी झाले आहेत.
डॉ वाल्मीक मुंडे हे नाममात्र दरात रुग्णांची सेवा करीत होते त्यामुळे परळी व परिसरात ते लोकप्रिय झाले होते .त्यांचे मूळ गाव परळी तालुक्यातील नागापूर जवळील वानटाकळी हे आहे .डॉ. मुंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,एक भाऊ, चार बहिणी असा परिवार आहे .

 

 

 

 अपघातास गुत्तेदार आणि प्रशासन कारणीभूत

गेल्या काही दिवसात जिरवाडी बायपास रस्त्यावर तिघांचा वेगवेगळ्या अपघातात मृत्यू झाला आहे. तसेच मोटर सायकल व ऑटो रिक्षांचे अपघात झाले आहेत..बायपास रस्ता  पूर्ण झाला आहे. परंतु  नाला काम  काही महिन्यापासून रखडल्यामुळे   अपघात होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासन व गुत्तेदारांची हलगर्जी कारणीभूत असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे

Advertisement

Advertisement