Advertisement

कोणीही याव कोणालाही गोळ्या घालाव्या; महाराष्ट्रात तर गुंडाराज

प्रजापत्र | Sunday, 11/02/2024
बातमी शेअर करा

 बारामती -वकील, डॉक्टर, पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्त्यांवर राज्यात हल्ला होत आहे, लोकसभेत मला लोकांनी या बाबत विधेयक मांडण्यास सांगितले आहे, राज्यात गुंडाराज आहे, कोणीही याव कोणालाही गोळ्या घालाव्या, पिस्तूल म्हणजे तर चेष्टा झाली आहे, ठाणे, नागपूर व पुणे या तिन्ही शहरात ज्या पध्दतीने कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडलेली आहे, याला मंत्रीच जबाबदार आहेत. देशात लोकशाही राहिलेली नाही, ही दडपशाहीच सुरु आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र राहिलेलाच नाही, गुंडाराज सुरु झाला आहे. या गुंडगिरीच्या विरोधात पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढणार आहोत ,अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली .      

 

            

बारामतीत पत्रकारांशी बोलताना सुळे यांनी कायदा सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले .सुळे म्हणाल्या ,माझ्यावर गोळी जरी चालवली तरी ही सुप्रिया सुळे दडपशाहीसमोर कधीही झुकणार नाही, लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी आमच्या गाड्या फोडल्या किंवा हल्ले केले, आमचा जीव घेतला तरी आम्ही घाबरणार नसल्याचा इशारा सुळे यांनी दिला.

Advertisement

Advertisement