Advertisement

 विविध मागण्यांसाठी वकिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रजापत्र | Friday, 09/02/2024
बातमी शेअर करा

वकील संरक्षण कायदा पारित करावा या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच वकील संघटनांनी आज शुक्रवार (दि. ९) हजारोंच्या संख्येने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अहमदनगर शहरातील जिल्हा न्यायालयापासून हा माेर्चा काढण्यात आला.

 

 अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आढाव या वकील दांपत्याच्या निर्घृण खून प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. या खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का प्रमाणे कारवाई करावी. वकिलांवर होणारे हल्ले, खोट्या केसेस यासाठी वकील संरक्षण कायदा शासनाने मंजूर करावा अशी मागणी माेर्चेक-यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी काही निवडक वकील बांधवांना आत मध्ये सोडण्याची भूमिका पोलिसांनी घेतल्यामुळे काही काळ पोलीस आणि वकील यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली.

 

 

या माेर्चात नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील वकील संघटनांसह आमदार संग्राम जगताप, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांनीही या मोर्चात सहभाग घेतला होता.अहमदनगर जिल्ह्यातील वकील संघटनांनी २९ जानेवारीपासून काम बंद आंदोलन ठेवले होते. वकिलांना पक्षकाराची बाजू मांडताना स्वतःचेही संरक्षण तितकेच महत्त्वाचे असल्यामुळे वकील संरक्षण कायदा सरकारने लवकरात लवकर मंजूर करावा अशी मागणी अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेश गुगळे यांनी केले आहे.

Advertisement

Advertisement