Advertisement

पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेली टोळी जेरबंद

प्रजापत्र | Tuesday, 06/02/2024
बातमी शेअर करा

बीड-पालीच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यासाठी आलेली धाराशिव जिल्ह्यातील दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेने आज (दि.६) सकाळी जेरबंद केली आहे.यावेळी चार आरोपी फरार झाले असून तिघे बीड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात आहेत. 

 

 

 

           धाराशिव जिल्ह्यातील अट्टल दरोडेखोर असणारे सात जण पाली येथे एका ट्रकमधून आले होते.यावेळी चोरीच्या हिशोबाने दबा धरून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी आज पहाटे बाळकृष्ण जायभाये,सुशांत सुतले,रामदास तांदळे,मारुती कांबळे,पठाण,पो.को.यादव या पोलीस कर्मचाऱ्यांना सूचना करून आरोपीना अटक करायला लावली.यावेळी ट्रकमधून तलवार,मोठे कटरसह,धारदार शस्त्र जप्त केले आहेत.या घटनेत पवन आश्रुबा कोळी (वय-४८ रा. पारा ता.वाशी जि.धाराशिव) याच्यासह दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर सचिन आबाराम काळे उर्फ आबा रामा काळे (रा.बकरवाडी ता.वाशी.जि.धाराशिव),मुरली देविदास उर्फ पिंट्या शिंदे (रा.पारा,ता.वाशी,जि.धाराशिव),दत्ता गोवर्धन शिंदे (रा.पारा,ता.वाशी,जि.धाराशिव), राघव उर्फ दगल्या आबा शिंदे (रा.पारा,ता.वाशी,जि.धाराशिव) हे चौघे फरार झाले .पोलिसांनी या कारवाईत १० लाख ४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून याप्रकरणाचा पुढील तपास श्री.कुकलारे ही करीत आहेत.

Advertisement

Advertisement