Advertisement

विशाल साडी सेंटर फोडले

प्रजापत्र | Thursday, 01/02/2024
बातमी शेअर करा

बीड- शहरातील डीपी रोडवर असलेले विशाल साडी सेंटरया दुकानाचे शटर तोडून चोरट्यानी जवळपास साडेचार लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 

 

सविस्तर माहिती अशी कि,बीड शहर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सारडा नगरी समोर असलेल्या चंद्रप्रकाश सेठी यांच्या विशाल साडी सेंटर मध्ये बुधवारी रात्री चोरी झाली.दुकानाचे समोरचे शटर तोडून चोरट्यानी गल्यात असलेल्या साडेचार लाख रुपयांवर डल्ला मारला आहे . घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी भेट दिली.नेमकी एवढी मोठी रोख रक्कम दुकानात कस काय होती,रोख रक्कम दुकानात का ठेवली असे प्रश्न पोलिसांसमोर पडले आहेत.

Advertisement

Advertisement