बुधवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. यावेळी सर्व खासदारांना अर्थसंकल्पीय अधिवेशनात हजर राहता यावे यासाठी निलंबित खासदारांचं निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिलीये.
प्रल्हाद जोशींनी माध्यामांशी संवाद साधताना पुढे म्हटलं की, निलंबित असलेल्या सर्वच खासदारांचं निलंबन मागे घेतलं जाणार आहे. मी स्वत: याबाबत लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा अध्याक्षांशी संवाद साधला आहे. तसेच निलंबन रद्द करण्याची विनंती केली आहे. विशेषाधिकार समित्यांशी संवाद साधून निलंबन रद्द करून खासदारांना पुन्हा एक संधी द्यावी अशी विनंती केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अर्थसंपल्पीय अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. १ फेब्रूवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लेखानुदान सादर करतील. अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंगळवारी सर्वक्षीय बैठक घेण्यात आलीये.संसदेत १३ डिसेंबर रोजी घुसखोरीचं प्रकरण झाल्यानंतर प्रचंड गोंधळ घालण्यात आला. गोंधळ सुरू असताना काही खासदार पीठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीपर्यंत पोहचले होते. यावेळी लोकसभेच्या १०० आणि राज्यसभेच्या ४६ सदस्स्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.