बीड-शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे घेतल्यानंतर शीतलकुमार बल्लाळ यांनी अवैध धंद्यावाल्याविरोधात कारवाईच्या मोहिमेला सुरुवात केल्याचे चित्र बीडमध्ये पाहायला मिळत आहे. शहरातील मुख्य वर्दळीचे ठिकाण असलेल्या सुभाष रोडवर एका दुचाकीस्वाराकडून देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी सोमवारी सायंकाळी 7.30 च्या दरम्यान ही कारवाई केली आहे.
बीड शहरातील ढाकणे हॉस्पिटलजवळ एका मोटारसायकलवरून देशी-विदेशी दारू विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती बीड शहर पोलीस ठाण्यातील अशपाक सय्यद,श्री. सिरसाट,श्री. वायकर, मनोज परजने यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुचाकीवर आलेल्या गणेश शामराव शिंदे (वय-37 ,रा.अंतरवन पिंपरी) यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. यावेळी आरोपीने दुचाकीला लावलेल्या पिशवीतून दारूसाठा पोलिसांच्या स्वाधीन केला. यात 100 देशी दारूच्या बाटल्या,विदेशी दारूच्या चार बाटल्या व मोटारसायकल असा 29 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.