Advertisement

 प्रजासत्ताक दिनानिमित्त १,१३२ जवानांना शौर्य पदके

प्रजापत्र | Thursday, 25/01/2024
बातमी शेअर करा

प्रजासत्ताक दिन २०२४ निमित्त पोलीस, अग्निशमन सेवा, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा यांच्या एकूण १,१३२ कर्मचाऱ्यांना शौर्य/सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. राज्यातील अठरा कर्मचाऱ्यांना ही पदके देण्यात येणार आहेत.  २७७  शौर्य पदकांपैकी २७५ जम्मू-काश्मीर पोलिसांचे ७२ जवान, महाराष्ट्रातील १८ जवान, छत्तीसगडमधील २६ जवान, झारखंडमधील २३ जवान, ओडिशाचे १५ जवान, दिल्लीतील ८ जवान, सीआरपीएफच्या ६५ जवानांना, २१ जवानांना शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहेत. इतर राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशातील SSB आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील उर्वरित कर्मचाऱ्यांना इतर पदके देण्यात आली आहेत.  

 

राष्ट्रपती पदक/शौर्य पदक

दोन श्रेणींमध्ये २७७ शौर्य पदके जाहीर करण्यात आली आहेत. ज्यात २७५ शौर्य पदके आणि दोन राष्ट्रपती पदके आहेत. या २७७ पैकी तब्बल १३३ जवानांना जम्मू आणि काश्मीरमधील शौर्यासाठी, ११९ जवानांना आणि उर्वरित २५ कर्मचाऱ्यांना इतर प्रदेशातील कारवाईसाठी पुरस्कृत केले जात आहे. दोन सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसाठी  आहेत.

 

 

विशिष्ट सेवेसाठी पदक

विशिष्ट सेवेसाठी दिल्या जाणाऱ्या पदकांमध्ये १०२ कर्मचारी आणि नंतर अंतर्गत ७५३ कर्मचार्‍यांना पुरस्कृत केले जाणार आहे. १०२ पदकांपैकी ९४ पोलीस खाते, तर प्रत्येकी चार अग्निशमन सेवा आणि नागरी संरक्षणासाठी  आहेत. ७५३ पदकांपैकी, ६६७ पदके पोलीस कर्मचार्‍यांसाठी आहेत, तर अग्निशमन सेवेसाठी ३२ आहे. नागरी संरक्षण आणि सुधारात्मक सेवा या दोघांना प्रत्येकी २७ पदके मिळाली आहेत.

Advertisement

Advertisement