Advertisement

रोहित पवार ईडीच्या कार्यालयात दाखल

प्रजापत्र | Wednesday, 24/01/2024
बातमी शेअर करा

 मुंबई |  राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते कार्यलयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. त्यापूर्वी ते सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे यांची तसेच अनेक कार्यकर्त्यांची भेट घेतली. तेथून ते ईडी कार्यालयात चौकशी साठी रवाना झाले. सुप्रिया सुळेही त्यांच्यासोबत आहेत.

 

रोहित पवार हे एकटे नाहीत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले. जामखेड, बारामती, पुणे येथून हजारो कार्यकर्ते काल रात्रीपासन मुंबईत दाखल असून त्यांनी रोहित पवार यांच्या समर्थनार्थ विविध घोषणा दिल्या.’एकच वादा रोहित दादा’ अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी रोहित पवरा यांना पाठिंबा दर्शवला. एवढेच नव्हे तर बलार्ड पियर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांसाठी बॅनर लावण्यात आले. ‘पळणारा नाही तर लढणारा दादा ‘ असे बॅनर वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले. तसेच ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असे लिहिलेले बॅनरही लावण्यात आले.

 

 

शरद पवारांचा पाठिंबा

दरम्यान रोहित पवार ईडी कार्यालयात जाताना त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत आहेत. तर त्यापूर्वी त्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन आजोबा शरद पवार यांचे आशिर्वादही घेतले. त्यांनी रोहित पवार यांना यशवंतराव चव्हाण यांचं पुस्तक भेट दिलं. दरम्यान रोहित पवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत शरद पवार हे पक्ष कार्यालयातच थांबणार आहेत.
 

Advertisement

Advertisement