Advertisement

शिवसेना जिल्हाप्रमुखपदी अनिल जगताप

प्रजापत्र | Tuesday, 23/01/2024
बातमी शेअर करा

बीड, (प्रतिनिधी):- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य

साधून आज बीड व माजलगाव विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी अनिलदादा जगताप व परळी व केज विधानसभा क्षेत्राच्या जिल्हाप्रमुखपदी सचिन मुळूक यांची अधिकृतपणे निवड करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जगताप आणि मुळूक यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलमताई गोन्ह, शिवसेना सचिव संजय मोरे, मंत्री दादासाहेब भुसे आदी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement