Advertisement

स्कॉर्पिओची मोटारसायकलला जोराची धडक

प्रजापत्र | Monday, 22/01/2024
बातमी शेअर करा

 अंबाजोगाई दि.२२ (प्रतिनिधी)  स्कॉर्पिओने मोटारसायकलला जोराची धडक दिल्याची घटना रविवार (दि.२१) रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान घडली असून या अपघातात मोटारसायकल वरील एकाचा मृत्यु तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सातेफळ पाटीवर झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी' तात्काळ जखमीला अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान अपघात झाला नंतर  स्कॉर्पिओ चालक गाडी जाग्यावर ठेऊन फरार झाला आहे. तर दारूच्या बाटल्या गाडीत असल्याची माहिती मिळाली आहे.

 

अधिक माहिती अशी कि, अहेमद नयूम शेख( वय २१ रा. शिराढोण) असं अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तर त्याच्यासोबत असलेल्या मित्राचे नाव अद्याप समजलेले नाही .कुंबेफळ  येथून सातेफळ कडे मोटारसायकल क्रमांक ( MH२४ X१४३२ )  ते दोघे येत होते. सातेफळ फाट्यावर त्यांच्या मोटारसायकलला पाठीमागून येणाऱ्या स्कॉर्पिओ क्रमांक ( MH २३ . AS ९४९५ ) पाठीमागून जोराची धडक दिली तर मयत याला २० फूट फरफटत नेल्याची स्थानिक नागरिकांनी माहिती दिली. शेख हा मित्राला घेऊन सातेफळ येथील एमडी वीटभट्टी वर कामगार असलेल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आला होते.

Advertisement

Advertisement