Advertisement

मराठा समाजाने आरक्षणासंदर्भातील आंदोलन मागे घ्यावे

प्रजापत्र | Sunday, 21/01/2024
बातमी शेअर करा

 मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल, असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे ही शासनाची भूमिका आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. मुंबई महानगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून या मोहिमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

 

 

मराठा समजला आरक्षण मिळावं म्हणून वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले. 

Advertisement

Advertisement