अंबाजोगाई - येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रूग्णालयात बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून हजारो रूग्ण दररोज येत असतात, या रूग्णालयात रूग्णांची संख्य अधिक असल्याने येथील औषध वितरण करण्यासाठी वेळ ही सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंतच असल्याने नंतर रूग्णांची गैर सोय लक्षात येता ही वेळ वाढविण्याची मागणी केज मतदार संघाच्या आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालय, बाह्यरुग्ण विभागात दररोज दोन हजारांपेक्षा जास्त रुग्णांची तपासणी केली जाते. बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासणीची व औषधी वितरणाची वेळ सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आहे. सदर रुग्णालयात येणार्या रुग्णांची प्रचंड संख्या पाहता सदर वेळेत आलेल्या सर्व रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे शक्य होत नाही. त्यामुळे बरेच रुग्ण तपासणी अभावी गावाकडे परत जातात. तसेच याठिकाणी चोवीसतास अपघात विभाग सुरु असल्याने सदर विभागात रुग्णांवर उपचार केला जाता. परंतु ठराविक वेळेनंतर औषधी वितरण विभाग बंद करण्यात येत असल्याने रुग्णांना खाजगी मेडिकलमधून औषध घ्यावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुदर्ंड सहन करावा लागत आहे. त्यामुळे पूर्वी प्रमाणे बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासणीची व औषधी वितरणाची वेळ सकाळी 9 ते 1 व सायंकाळी 4 ते 6 करणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरून ग्रामीण भागातून आलेल्या सर्व रुग्णांना तपासणी करून योग्य उपचार मिळतील. तरी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय रुग्णालय, अंबाजोगाई येथील बाह्यरुग्ण विभागात रुग्ण तपासणीची व औषधी वितरणाची वेळ सकाळी 9 ते 1 व सायंकाळी 4 ते 6 करणे बाबतची मागणी केज विधानसभेच्या आ.नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.