Advertisement

बलभीम महाविद्यालयात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित या विभागांच्या वतीने राष्ट्रीय चर्चासत्र

प्रजापत्र | Friday, 19/01/2024
बातमी शेअर करा

बीड : येथील बलभीम महाविद्यालयात शनिवारी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित या विभागांच्या वतीने एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे. उद्‍घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते होईल.

 

 

रसायनशास्त्र विभागाच्या सत्रांना हैदराबाद येथील पॉलिमार आणि फंक्शनल मटेरिअल डिव्हिजन आयआयसीटी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सिद्धनाथ भोसले, डॉ. संदीप भराटे, शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथील रसायनशास्त्र विभागातील डॉ. गोविंद कोळेकर हे मार्गदर्शन करतील. तर, भौतिकशास्त्र विभागाच्या सत्रांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) येथील विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रोफेसर एम. के. पाटील, जालना येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मधील प्रोफेसर गिरीश जोशी व मुंबई विद्यापीठातील डॉ. प्रवीण वाळके मार्गदर्शन करतील.

 

गणित विभागाच्या सत्रांना बेल्लारी, कर्नाटक येथील विजयनगर श्रीकृष्ण देवराय विद्यापीठ येथील डॉ. अश्विनकुमार, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ (नांदेड) येथील गणित विभागाचे डॉ. नितीन दारकुंडे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गणित विभागप्रमुख डॉ. किर्तीवंत घडले हे मार्गदर्शन करतील. चर्चासत्रात सदर विषयांच्या प्राध्यापकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. संतोष उंदरे व संयोजकांनी केले.
 

Advertisement

Advertisement