Advertisement

उचलीच्या पैशावरून मजुराचे अपहरण

प्रजापत्र | Tuesday, 16/01/2024
बातमी शेअर करा

बीड - ऊसतोडणीच्या उचलीचे पैसे का देत नाही? या कारणावरून एका मजुराचे शेतामधून अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी चौदा जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ आहे (राठोड) रा. ढेकणमोहा यांच्याकडे उचलीचे पैसे थकित होते. या पैशासाीं एकनाथ आडे यांना शेतातून उचलून नेण्यात आले. या प्रकरणी कैलास एकनाथ आडे यांच्या फिर्यादीवरून आरोपी राम माळी, गजानन चव्हाण, साबळे विठ्ठल कुंहलिक, सुरेश पाटील (रा. सर्व कोल्हापूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement