Advertisement

दुष्काळी परिस्थितीत आ.सोळंकेंच्या वाढदिवसावर वडवणीत लाखोंची उधळपट्टी

प्रजापत्र | Sunday, 14/01/2024
बातमी शेअर करा

 वडवणी दि.१४-जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून गावागावात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.मराठवाड्यातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्यामध्ये आघाडीवर आलेल्या बीड जिल्ह्यात मागच्या वर्षी २६७ शेतकऱ्यांनी जीवन संपविले आहे.एकीकडे असे चित्र असताना असताना लोकप्रतिनिधी असलेल्या आ.प्रकाश सोळंकेनी स्वतःच्या वाढदिवसावर मात्र लाखोंची उधळपट्टी केल्याचा प्रकार वडवणीत समोर आला.आ.प्रकाश सोळंके यांच्यावर काल वाढदिवसानिमित्त वडवणीमध्ये जेसीबीने पुष्पवृष्टी करत क्रेनने हार घालून जल्लोष साजरा करण्यात आला.या ठिकाणी शेतकऱ्यांना चार पैशांची मदत आमदारांकडून करण्यात आली असती तर त्या वाढदिवसाचे महत्व आणि आनंद आणखी राहिला असता असे वडवणी शहरातून शेतकऱ्यांमधून बोलले जात होते. वडवणीत आ. प्रकाश सोळंके यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.

 

 

 

 

 

त्याचबरोबर अनेक जेसीबीच्या साह्याने आमदार महोदय यांच्यावर पुष्पवृष्टी करून मोठ्या क्रेनच्या सहाय्याने पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आले यावर्षी महाराष्ट्रावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे त्यातच बीड जिल्ह्यात अल्प पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची वाट लागली शेतकऱ्यांनी शेतीत केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे आज शेतकऱ्याच्या मालाला कवडी मोलाचा भाव आहे कापूस सोयाबीन या प्रमुख पिकांसह इतर पिकांना भाव नाही शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा कंपनीने विमा दिला नाही जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे या मूलभूत प्रश्नाकडे आमदार महोदयांनी लक्ष देण्याचे गरज होती मात्र त्यांनी आपल्या वाढदिवसावर लाखो रुपयांची उधळपट्टी करून एक प्रकारे शेतकऱ्याची चेष्टा केल्याची दिसून येते आपल्या वाढदिवसावर केलेला खर्च जर सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबाला दिला असता तर त्या कुटुंबाला नक्कीच आर्थिक हातभार लागला असता परंतु असे न करता वडवणी शहरात मोठे बॅनर फटाक्याची आतिषबाजी करून जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच क्रेनच्या साह्याने दोन क्विंटल फुलाचा हार आमदारांना घालून तीव्र दुष्काळात ही वाढदिवसावर लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली यामुळे शेतकरी वर्गात मात्र संतापाची लाट उसळली आहे.

Advertisement

Advertisement