राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश
उदगीर प्रतिनिधी :उदगीर नगरपालिकातील सर्वे नंबर .3,155 ते 338.यांना शासनाने उदगीर नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे .अनेक दिवसांपासून येथील नागरिकाची हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी होती शासनाने या मागणीला मान्यता दिली आहे अशा माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की उदगीर शहराचा विकास झपाट्याने होत आहे शहरात विविध विकास कामे सुरू आहेत शहराचा विस्तार होत आहे सर्वे नंबर 3,155,ते 338 येथील नागरिकाची अनेक दिवसांपासून नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी होती हे सर्वे नंबर लगतच्या ग्रामपंचायत मघ्ये समाविष्ट नव्हते त्यामुळे येथील नागरिकांना खरेदी खत बनविणे,अशा अनेक महसूली समस्या निर्माण होत होत्या याबाबत राज्य शासनाकडे हद्द वाढीचा प्रस्ताव सादर केला होता. याला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये मलकापूर, सोमनाथ पुर ,निडेबन,पिंपरी मादलापुर येथील काही सर्वे नंबर नगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात येणार आहेत
यात उदगीरच्या उत्तरेस सर्वे नं 97 च्या उत्तर पश्चिम कोपरा ते सर्वे नं 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पर्यंत
पूर्व दिशेला
सर्वे नंबर 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पासून सर्वे नंबर 254च्या दक्षिण पुर्व कोपरा
दक्षिण दिशेला
सर्वे नंबर 254 दक्षिण पुर्व कोपरा ते सर्वे नंबर 332 च्या पश्चिम दक्षिण कोपऱ्या पर्यंत
पश्चिम दिशेला
सर्वे नंबर 333 च्या दक्षिण पश्चिम कोपरा ते सर्वे नंबर 97 उत्तर पश्चिम पर्यंत हद्द वाढीस शासनाने मान्यता दिली आहे.
नगरपालिकेच्या हद्दी मुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे नागरिकांच्या महसूली अडचणी दुर होणार आहेत अनेक वर्षी पासून शासन स्तरावर प्रलंबित असलेली हद्द वाढीची मागणी सहा माहिण्यात पाठपुराव्याने मार्गि लागली आहे लातूर जिल्हा परिषद, औरंगाबाद विभागीय आयुक्त, व मंत्रालयातील नगरविकास विभागात या संदर्भात सतत पाठपुरावा केला गेला होता आज शासनाने या हद्द वाढीस मान्यता दिली आहे अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.