एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी बंड केल्यापासून राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गटातील अनेकांना मंत्रीपदाची आस होती, मात्र हा रखडलेला मंत्रीमंडळ विस्तार अद्याप झाला नाही. या मंत्रीमंडळ विस्तारावरुन अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असतात. अशातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरुन सर्वात मोठे विधान केले आहे.
काय म्हणालेत संजय शिरसाट?
"राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. कारण जयंत पाटील अजित पवारांसोबत येणार होते. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता, तेच शरद पवार साहेबांनाही सांगणार होते.. असा खळबळजनक दावा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. तसेच जयंत पाटील हे शरीराने तिकडे आहेत मात्र मनाने इकडेच आहेत. ते आले तर येतील मात्र त्यांच्या मुळेच मंत्रीमंडळ विस्तार रखडलेला होता. त्या बैठकीला सुप्रिया सुळे ही होत्या..." असेही संजय शिरसाट म्हणालेत.