पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे जिल्हा नियोजन बैठकीसाठी सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी चंद्रकांत दादा पाटील यांच्या ताफ्या समोर एका आंदोलकाने गावातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची तक्रार करत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिसरात एकच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांनी या आंदोलक तरुणाला ताब्यात घेतले.
नेमकं काय घडलं?
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोलापूरमध्ये विभागीय नाट्य संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. तसेच मंत्रीमंडळाची बैठकही पार पडली. या बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मोठा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
चंद्रकांत दादा पाटील यांच्या ताफ्या सामोर एका आंदोलकाने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दादा कळसाईत असे या तरुणाचे नाव आहे. गावातील भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांबद्दल तक्रार करत तरुणाने गोंधळ घातला. तालीम चोरीला गेली मात्र संबंधित अधिकाऱ्यांनाकडून दखल घेतली जातं नसल्याचा आरोप करत हातात जळत कोलीत घेऊन त्याने आंदोलन केले.पोलिसांनी तात्काळ या आंदोलक तरुणाला ताब्यात घेतले.
दरम्यान, या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी "लोकसभेची आचारसंहिता लागू शकते त्या आधी निधी संपवायचा आहे. आतापर्यंत ३८.७५ टक्के निधी खर्च झाला आहे, पण हे फार कमी आहे .पण अजून दोन महिने आहेत, त्यात हा निधी खर्च होईल.." अशी माहिती दिली.तसेच "पुढच्या वर्षीचा आरखडामध्ये आम्ही ८५५ कोटी रुपये मागणार आहोत, मागच्या निधी पेक्षा १११ कोटी रुपये अधिकचे मागणार आहोत. शासकीय रुग्णालयात CT स्कॅन मशीन बंद आहे. आता शासनाकडे प्रयत्न करु जर नाही झालं तर नियोजन मधून पैसे देऊ..." असे चंद्रकांत पाटील म्हणाले.