मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मॅसेज आला आहे. आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली आहे. तसेच आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसी बँकेत देखील बॉम्ब ठेवल्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे.
धमकीत काय म्हटलय?
सकाळी आरबीआयच्या ईमेल आयडीवर खिलाफत इंडियाच्या ईमेलवरुन धमकी देण्यात आली आहे. दुपारी दिड वाजता मुंबईत ११ ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट होतील, अशी धमकी देण्यात आली होती.काही मागण्या देखील या ईमेलमधून करण्यात आल्या होत्या. आरबीआयचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचे नाव घेऊन मोठा घोटाळा देशात होत आहे. त्यामुळे या दोघांचे तात्काळ राजीनामे घ्या, अशी मागणी देखील ईमेलमध्ये करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी केली जात आहे. अधीकृत ईमेलवर आयडीवर ही धमकी देण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी चौकशी केली असता ११ ठिकाणी काहीही आक्षेपार्ह सापडले नाही.