Advertisement

 काळजीचं करु नका, शिरुरमध्ये उमेदवार निवडूनच आणणार 

प्रजापत्र | Monday, 25/12/2023
बातमी शेअर करा

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दंड थोपटले आहेत. अमोल कोल्हे यांना पाडण्याचा निर्धार अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिरुर लोकसभा मतदार संघात शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट असा हायहोल्टेज सामना रंगण्याची शक्यता आहे.

 

काय म्हणालेत अजित पवार?

"पाच वर्षात एका खासदाराने त्याच्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांनी मतदारसंघ दुर्लक्षित केला होता. त्यांना निवडून आणण्यासाठी मी स्वतः जीवाचे रान केलं होते.. असे अजित पवार म्हणाले. मी बोलणार नव्हतो पण यांना आता उत्साह आला आहे. कोणाला पद यात्रा सुचते, कोणाला संघर्ष यात्रा काढायची आहे.." असा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

 

 

अमोल कोल्हेंना थेट आव्हान !

"आम्हाला वाटले होते ते वक्ते उत्तम आहे. संभाजी महाराज यांच्याबद्दल उत्तम भूमिका त्यांनी बजावली होती. पण शिरुरमध्ये आम्ही पर्याय देणार, तुम्ही काळजीच करु नका. तिथे असलेला उमेदवार निवडणून आणणारचं.." असे थेट आव्हानही अजित पवार  यांनी दिले.
 

Advertisement

Advertisement