Advertisement

  शालेय पोषण आहारातून अंडी गायब होणार? 

प्रजापत्र | Monday, 25/12/2023
बातमी शेअर करा

शालेय पोषण आहारातून अंडी रद्द करा या मागणीसाठी काही दिवसांपूर्वी हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारलं होतं. आमच्या सात्विक धर्माला बाधा येत असल्याचा संघटनांनी आरोप केला होता. वारकरी संघटना आणि काही हिंदुत्ववादी संघटनांसह जैन संघटना शिवाजी पार्क येथील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने देखील या मागणीला पाठिंबा दिला आहे. शालेय पोषण आहारात ‘अंडी’ समावेशाचा निर्णय रद्द करा अशी मागणी भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने केली आहे. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

 

तुषार भोसले यांनी लिहिलेल्या पक्षात म्हटलंय की, आपल्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये विद्यार्थाच्या पोषण आहारात 'अंडी' चा समावेश केला आला आहे. मात्र या निर्णयाबद्दल आम्ही तीव्र नापसंती व्यक्त करीत आहोत.

 

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आणि विविध पंथ संप्रदायांच्या प्रमुखांनी व घटकांनी देखील याबाबत आमच्याकडे कडाडून विरोध व्यक्त केला आहे. त्यामुळे आपण हा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी आमची मागणी आहे.राज्यातील साधु-संतांच्या, विविध समाज घटकांच्या तसेच आध्यात्मिक क्षेत्राच्या भावनांचा आदर राखत आपण हा निर्णय रद्द कराल, अशी मला आशा आहे.

Advertisement

Advertisement